शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

इतिहास, थोड्या वेगळ्या चष्म्यातून...



बरेच दिवस लिहीन म्हणत होतो अन आता सुरु करतोय कारण, अर्थातच पत्नीचा आग्रह.

ब्लॉगच नाव आहे 'थोडं वेगळ्या चष्म्यातून ....' आणि विषय इतिहास.  नावाप्रमाणे थोडं वेगळ्या प्रकारे बघण्याचा प्रयत्न असेल.  बरेचसे विषय वेगळे असतील तसाच दृष्टिकोनसुद्धा वेगळा असेल.

सर्वप्रथम मी हे जाहीर करु इच्छीतो की मी हे लिहतोय ते एक इतिहासप्रेमी म्हणून, संशोधक वगैरे मला आव आणायचा नाही.  माझ्या इतिहासप्रेमाला जपण्यासाठी असेल एक शब्दांजली...  एक प्रेमी या नात्याने मी जी पुस्तके आजवर चाळली ती सर्व तुमच्या पुढे ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

कोणतेही अनुमान नक्कीच काढणार नाही पण मते मात्र मांडेन... अर्थात त्याविषयी सहमत होण्याचा वा न होण्याचा निर्णय आपलाच आणि 'तुच्छ' वादांपासून मी दूरच असेन.  मला इथे महत्वाच्या गोष्टी मांडायच्या आहेत अन त्याही सोप्या भाषेत.

मी सुरवात मुख्यतः सध्याच्या माझ्या आवडत्या दोन विषयांपासून करेन . एक आहे "गाजलेली पश्चिमेकडील प्राचीन युद्धे" अन दुसरा असेल "प्रसिद्ध युरोपिय वाटसरुंचे मराठा साम्राज्याबाबतचे लिखाण".

आपल्या सुचनांसाठी अन प्रतिक्रियांसाठी आतुर ....!!

- एक तीव्र इतिहासप्रेमी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा