शनिवार, २६ मे, २०१२

अमेरिकेचा शोध कोणी लावला? भाग ३



मी वर उल्लेख केल्यामध्ये हिमांशु यांनी उल्लेख केलेल्या वायकींगचा उल्लेख टाळला कारण वायकिंग कोलंबस अगोदर अमेरिका खंडात पोहोचले यात कोणतेही दुमत सध्या कोणत्याही संशोधकास राहिलेले नाही . 


पश्चिम अशियामधील वायकिंग टॊळ्यांनी युरोपात येऊन प्रचंड धुमाकूळ माजवला व पश्चिम उत्तर युरोपात वस्ती केली . मुळात केवळ सशक्त , बलशाली व वेगवानच नव्हे तर दिसायलाही खूप सुंदर जहाजे निर्माण करुन युरोपीयन नद्यांमधुन प्रवास करत संपूर्ण युरोपात प्रचंड लुटालूट करत वायकिंगजनी इसवी सन आठव्या शतकांनंतर युरोपात दहशत निर्माण करुन उत्तर पश्चिम युरोपात सध्याच्या स्कॅंडेनेव्हिया , नॉर्वे , स्वीडन , डेन्मार्क आईसलंड येथे वस्ती केली पुढील काळात ख्रिश्चन धर्म स्विकारुन सांस्कृतिक जीवनही युरोपशी आपलेसे केले . समुद्रसफ़र हा त्यांचा आवडता शौक त्यामुळे डेन्मार्कहून त्यांनी आईसलंड व ग्रीनलंड बेटांचा शोध लावून शक्य तिथे वस्ती केली . युरोपात नद्यांमधील दळणवळणाचे मार्ग आखले जे आजही वापरात आहेत . 


ली या खलाशाचे  यांचे वायकींग फ़्लीट हे डेन्मार्कहून अटलांटिक महासागरात ग्रीनलंड येथे असलेल्या वस्त्यांमध्ये थांबून पश्चिमेकडॆ प्रवास कायम राखत सध्याच्या उत्तर अमेरिकेतील कॅनडा येथे पोहोचले ह्या दाव्यास सर्वमान्यता मिळालेली आहे व ते जिथे पोहोचले त्यास न्यू फ़ाऊंडलंड असे म्हणतात . वायकिंग घरांचे नमुने त्यांच्या चाचण्या यातून ह्या वायकिंग वस्त्या आहेत हे स्पष्ट झालेलेच आहे . कॅनडात आढळलेली जुनी वायकींग नाणी यावरुन वायकिंगकडे हा बहुमान गेलेलाच आहे . 



वादाचा मुद्दा केवळ कॅनडामधील भूभाग ओलांडून नायगारामार्गे ते अमेरिकेतही आले होते का हा आहे व त्यामध्ये अनेक विवाद आहे व त्यावरही संशोधन चालू आहेच . 



असो मुळात हा बहुमान कोलंबसकडून इतरांकडे गेला तरी कोलंबसचे महत्त्व कधीही कमी होणार नाही कारण ख्रिस्तोफ़र कोलंबस हा केवळ अमेरिकेत पोहोचला नाही तर त्याने तो मार्ग शोधून त्याच्या संपूर्ण युरोपात प्रचार केला . पुढे स्पेन , ब्रिटन , पोर्तुगीज , फ़्रेंच यांनी अमेरिकेत येऊन प्रथम आर्थिक उत्पीडनाचे , त्यानंतर युरोपीय वसाहतवादाचे , त्यानंतर दळणवळणाचे ,त्यानंतर युरोपीय व अमेरिकन सांस्कृतिक आर्थिक घडामोडींचे , नंतर राजकीय व आर्थिक सबलीकरणाचे एक युग गाजवले व त्याचे मूळ म्हणजे कोलंबसचा प्रवास याकडेच जाते ... 

Published....

अमेरिकेचा शोध कोणी लावला? भाग २


कोलंबस अमेरिकेत पोहोचल्यानंतर राणी एलिझाबेथने वेल्श  खलाशी अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पूर्व किनारी सर्वात अगोदर पोहोचल्याचा दावा करुन त्याचा खूप प्रचार केला होता . तसेच अमेरिकेतील वेल्श असोसिएशन अजुनही तो वेल्श खलाशी अमेरिकेत पोहोचल्याचा सण साजरा करतात त्यांनी किनार्‍यावर पोहोचल्याचा बोर्डही लावला होता परंतु तो अमेरिकन इतिहास विभागाने काढून टाकला . हा दावा फ़ारसा सशक्त नाही . 



आयर्लंड येथील सेंट ब्रेंडन या ख्रिस्ती धर्मोपदेशकाने एका अज्ञात स्थळी पोहोचल्याचे अनेक मनोरंजक लिखाण केलेले आहे व बरेच जण ते अज्ञात स्थळ म्हणजे अमेरिका व तो धर्मोपदेशक हा अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पूर्व किनारी पोहोचला हा दावा देखिल करतातच . हा दावा तसा खूपच दुर्बल आहे परंतु खुद्द कोलंबसने याबाबत संशोधन केलेले असल्याने ह्या दाव्याला बळ आहे  . 


अमेरिकेतील शारोकी नावाचे मूळ रहिवाशी नंतर मोठ्या प्रमाणात ज्यू झाले आहेत , त्यांनी जुन्या धर्मग्रंथातील आधार घेऊन सर्वात पहिल्यांदा पोहोचल्याचा दावा केलेला आहे अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याला संपूर्ण हिंद महासागर व पॅसिफ़िक महासागर ओलांडून पोहोचण्याचा अगदी अशक्य असा दावा आहे . त्या दाव्याला बळ पोहोचण्यासाठी शारोकीं सध्या स्वत:च्या जनुकीय चाचण्या करण्यात गर्क आहेत व आपण मुळचे मध्य अशियातील ज्यूंचे वंशज आहोत असा दावा ते पुढे आणणार आहेत . सध्यातरी याची विश्वासहर्ता अतिशय तकलादू आहे . 



मध्यंतरी , दक्षिण अमेरिकेतील एका सभ्यतेमधील मातीची भांडी व तेथे सापडलेली जुनी भांडी याचा अभ्यास करताना एकाला असे आढळले की दक्षिण जपानमध्ये अशाच प्रकारची भांडी आहेत . दक्षिण अमेरिकेतील एक टीम जपानमध्ये जाऊन त्यातील साधर्म्य स्पष्ट करुन थांबले नाहीत तर पुढे जपानी व त्यांनी मिळून 

 दक्षिण अमेरिकेत पोहोचल्याचा दावा केलेला आहे . मातीच्या भांड्यांबरोबरच एक जीव घेण्या विषाणूचे दक्षिण अमेरिका व जपान मधील साधर्म्य सुद्धा या दाव्याला पुष्टी देण्यासाठी जोडण्यात आलेले आहे . 

सुमारे इसवीसन पूर्व आठव्या शतकांत जपानी नदीत मासेमारीसाठी छोट्य़ा बोटी वापरत असत व त्या बोटी वापरुन पॅसिफ़िक महासागर ओलांडून दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याला पोहोचणे हे अगदीच अशक्य आहे हे आढळल्यावर नवीन थिअरी निर्माण करुन जपानी अलास्काच्या किनार्‍याहून मासेमारी करत करत हळूहळू दक्षिण अमेरिका करत सरकले असा दावा त्यांनी केलेला आहे याबाबत खूप संशोधन सुरु आहे परंतु सध्यातरी दाव्यात फ़ारसा दम नाही .


एका संशोधकाने , हिमयुगात जेंव्हा उत्तर भूगोलार्धातील बहुतेक समुद्र हा हिमाच्छादित होता तेंव्हा सैबेरियातून अनेक माणसे बर्फ़ावरुन चालत व सीलच्या शिकारावर जगत अलास्कामार्गे अमेरिकेत येऊन सुमारे इसवीसन पूर्व २०००० च्या दरम्यान वस्ती बनवली असाही एक दावा आहे . याबाबतीत बरेच संशोधन सुरु आहे व केवळ सैबेरिया नव्हे तर अनेक इतर भूभागातूनही लोक आले असावेत अश्या दाव्यावर संशोधन आहे अर्थात हा दावा अगदी वेगळ्या प्रकारचा आहेच व विश्वासहर्ताही कमीच आहे .

दक्षिण भूगोलार्धात पॅसिफ़ीक महासागरात , सध्याच्या न्यूझीलंड  फ़िजीजवळ.सुमारे हजारावर बेटे आहेत . पूर्वी येथे पॉलिनेशियन लोकांनी ती एकूण एक बेटॆ जिंकून तेथे वस्ती बनवली होती . टेक्नीकली आज ते जरी वेगळे देश असले तरीही त्या समूहास पॉलिनेशिया असेच म्हणतात . टेक्निकली देश या संज्ञेची आजची व्याख्या बघितली तर त्या काळी तो जगातील सर्वात मोठा देश होतो जिथे जमीन व पाण्याच्या ताब्याचे गुणोत्तर १: ६०० च्या आसपास आहे . पॉलिनेशियन अर्थातच अत्यंत जबरदस्त खलाशी होते हे त्यांच्या पसरलेल्या भूभागावरुन व ताब्यावरुन स्पष्ट होते . पॉलिनेशियन संस्कृती व दक्षिण अमेरिकन संस्कृती , भाषा इत्यादीमध्ये अनेक विविध साधर्म्य स्पष्ट झालेलेच आहे तसेच अनेक खाणाखुणा स्पष्ट झालेल्याच आहेत . बर्‍याच फ़ळांची , भाज्यांची नावे समान आहेत , जुन्या कोंबड्य़ांच्या हाडांची तपासणी , मासेमारीची पद्धत  तसेच राहणीमानही अगदी सारखे आहेच . पॉलिनेशयनांनी २० व्या शतकाच्या सुरवातीला जोरदार दावा केला व एका संशोधकाने तर चक्क समकालीन पॉलिनेशियन जहाजाचे मॉडॆल बनवून त्याने ज सुमारे १०० दिवसात दक्षिण अमेरिकेपासून वळील पॉलिनेशयन बेटापर्यंत प्रवास करुन जबरदस्त खळबळ माजवली सुमारे इसवी सन दहाव्या शतकात पॉलिनेशियन तेथे पोहल्याचा हा अगदी सशक्त दावा आहे परंतु काही शास्त्रज्ञांचे मात्र दुमत आहे .
हा अत्यंत सशक्त दावा आहे ....

जेंव्हा आपण म्हणतो दाव्यामधील विश्वासहर्ता कमी आहे त्यामध्ये असे म्हणूयात सध्याच्या संशोधनामध्ये जे स्पष्ट झाले आहे त्या अधारावर ... जसेजसे संशोधन होऊल तसे तसे अजूनही गोष्टी स्पष्ट होतीलच ..



Published ....

अमेरिकेचा शोध कधी लागला? भाग १

सर्वप्रथम अमेरिकेत अगोदरपासून मूळ रहिवाशी रहात होते व त्यांचे वंशज अजूनही आहेत त्यामुळे शोध लावला हा वाकप्रचारच हास्यास्पद आहे . 

हे खरे आहे की , इतका प्रचंड मोठा भूभाग , उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका खंड हा , इतर ज्ञात जगापासून खूप काळ अज्ञात राहिला . 

असो , कोलंबसापूर्वी इतर अनेक राष्ट्रांनी अमेरिकामध्ये प्रथम पोहोचण्याचे ढिगभर दावे केलेले आहेत व संशोधकांनी त्या दाव्यांमधील सत्यतेनुसार त्याची विश्वासहर्तासुद्धा अधोरेखित केलेली आहे . 

आमचे मित्र हिमांशु यांनी सांगितल्याप्रमाणे ’ झेंग हे ’ जगातील सर्वात मोठे मरिन फ़िल्ट (कृपया यास मराठी शब्द सुचवावा) घेऊन पोहोचल्याचा एक सबळ दावा झालेलाच आहे व यात अक्षरक्ष: कोणतेही दुमत नाही की ती फ़्लीट आफ़्रिकेतील मादास्कागर जवळ व दक्षिण आफ़्रिकेत पोहोचली , आफ़्रिका खंडाला वळसा घालून ते अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर पोहोचले व सध्या असलेल्या बहामा या बेटाजवळ अमेरिका खंडालाच व सध्याच्या अमेरिकेत पोहोचले असा दावा आहे . , बहामास जवळील समुद्रात इंग्रजी जे आकाराचे एक स्ट्रक्चर आहे ते मानव निर्मित की नैसर्गिक केवळ असाच वाद नाही तर चीनी जहाजांच्या दुरुस्तीचे ठिकाण असावे . अर्थात हिमांशुने उल्लेख केल्याप्रमाणे जगाचा नकाशा (उलटा) आहेच परंतु तो २०० वर्ष नंतर उजेडात आल्याने त्याची विश्वासहर्ता थोडीशी वादात आहे .हा दावा काही जण करतात व हा अतिशय सशक्त दावा आहे .

अर्थात वर सांगितल्याप्रमाणे हा एकमेव दावा नाही , खुद्द चिन्यांनी यापूर्वीही पोहोचल्याचा दावा केलेला आहे इसवी सन पाचव्या शतकात अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर पोहोचल्याचा दावा केलेलाच आहे व तेथे एका मरीन डायव्हरला जुने  जहाजांचे नांगर सापडले व ते अशियायी चिनी पद्धतीच्या नांगरांशी जुळत होते .. 

अर्थात वरील दाव्या इतका तो सशक्त नाही .कारण  त्याकाळात चिनी लोकांकडे समुद्रात लांब पल्ल्याच्या सफ़रीसाठी स्वत:चे जहाज विकसित नव्हते . हिंदुस्थान , चिनसकट संपूर्ण अशियात अरब जहाजांचा वापर होत असे व हळू हळू सरकणार्‍या अरब जहाजांनी पॅसिफ़िक महासागर ओलांडणे अशक्य आहे .  

इतर दाव्यांबद्दल लिहायचे झाल्यास किमान तीन चार तास जातील , अमेरिकेत पोहोचल्याचा दावा करण्यापैकी , 
खुद्द ब्रिटन , आयर्लंड , पॉलिनेशिया , इस्त्राईल , जपान इत्यादींनी अनेक दावे केलेले आहेत .

तज्ञांनी , त्या काळात असलेली उपलब्ध जहाजे त्यांची एकूण लायकी , समुद्राचे प्रवाह तसेच पोहोचायला लागणारा वेळ , सांस्कृतिक साधर्म्याची शक्यता इत्यादी इत्यादी वरुन प्रत्येक दाव्यांच्या विश्वासहर्ता स्पष्ट केलेली आहे.


Published....

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११


इतिहास, थोड्या वेगळ्या चष्म्यातून...



बरेच दिवस लिहीन म्हणत होतो अन आता सुरु करतोय कारण, अर्थातच पत्नीचा आग्रह.

ब्लॉगच नाव आहे 'थोडं वेगळ्या चष्म्यातून ....' आणि विषय इतिहास.  नावाप्रमाणे थोडं वेगळ्या प्रकारे बघण्याचा प्रयत्न असेल.  बरेचसे विषय वेगळे असतील तसाच दृष्टिकोनसुद्धा वेगळा असेल.

सर्वप्रथम मी हे जाहीर करु इच्छीतो की मी हे लिहतोय ते एक इतिहासप्रेमी म्हणून, संशोधक वगैरे मला आव आणायचा नाही.  माझ्या इतिहासप्रेमाला जपण्यासाठी असेल एक शब्दांजली...  एक प्रेमी या नात्याने मी जी पुस्तके आजवर चाळली ती सर्व तुमच्या पुढे ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

कोणतेही अनुमान नक्कीच काढणार नाही पण मते मात्र मांडेन... अर्थात त्याविषयी सहमत होण्याचा वा न होण्याचा निर्णय आपलाच आणि 'तुच्छ' वादांपासून मी दूरच असेन.  मला इथे महत्वाच्या गोष्टी मांडायच्या आहेत अन त्याही सोप्या भाषेत.

मी सुरवात मुख्यतः सध्याच्या माझ्या आवडत्या दोन विषयांपासून करेन . एक आहे "गाजलेली पश्चिमेकडील प्राचीन युद्धे" अन दुसरा असेल "प्रसिद्ध युरोपिय वाटसरुंचे मराठा साम्राज्याबाबतचे लिखाण".

आपल्या सुचनांसाठी अन प्रतिक्रियांसाठी आतुर ....!!

- एक तीव्र इतिहासप्रेमी