शनिवार, २६ मे, २०१२

अमेरिकेचा शोध कधी लागला? भाग १

सर्वप्रथम अमेरिकेत अगोदरपासून मूळ रहिवाशी रहात होते व त्यांचे वंशज अजूनही आहेत त्यामुळे शोध लावला हा वाकप्रचारच हास्यास्पद आहे . 

हे खरे आहे की , इतका प्रचंड मोठा भूभाग , उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका खंड हा , इतर ज्ञात जगापासून खूप काळ अज्ञात राहिला . 

असो , कोलंबसापूर्वी इतर अनेक राष्ट्रांनी अमेरिकामध्ये प्रथम पोहोचण्याचे ढिगभर दावे केलेले आहेत व संशोधकांनी त्या दाव्यांमधील सत्यतेनुसार त्याची विश्वासहर्तासुद्धा अधोरेखित केलेली आहे . 

आमचे मित्र हिमांशु यांनी सांगितल्याप्रमाणे ’ झेंग हे ’ जगातील सर्वात मोठे मरिन फ़िल्ट (कृपया यास मराठी शब्द सुचवावा) घेऊन पोहोचल्याचा एक सबळ दावा झालेलाच आहे व यात अक्षरक्ष: कोणतेही दुमत नाही की ती फ़्लीट आफ़्रिकेतील मादास्कागर जवळ व दक्षिण आफ़्रिकेत पोहोचली , आफ़्रिका खंडाला वळसा घालून ते अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर पोहोचले व सध्या असलेल्या बहामा या बेटाजवळ अमेरिका खंडालाच व सध्याच्या अमेरिकेत पोहोचले असा दावा आहे . , बहामास जवळील समुद्रात इंग्रजी जे आकाराचे एक स्ट्रक्चर आहे ते मानव निर्मित की नैसर्गिक केवळ असाच वाद नाही तर चीनी जहाजांच्या दुरुस्तीचे ठिकाण असावे . अर्थात हिमांशुने उल्लेख केल्याप्रमाणे जगाचा नकाशा (उलटा) आहेच परंतु तो २०० वर्ष नंतर उजेडात आल्याने त्याची विश्वासहर्ता थोडीशी वादात आहे .हा दावा काही जण करतात व हा अतिशय सशक्त दावा आहे .

अर्थात वर सांगितल्याप्रमाणे हा एकमेव दावा नाही , खुद्द चिन्यांनी यापूर्वीही पोहोचल्याचा दावा केलेला आहे इसवी सन पाचव्या शतकात अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर पोहोचल्याचा दावा केलेलाच आहे व तेथे एका मरीन डायव्हरला जुने  जहाजांचे नांगर सापडले व ते अशियायी चिनी पद्धतीच्या नांगरांशी जुळत होते .. 

अर्थात वरील दाव्या इतका तो सशक्त नाही .कारण  त्याकाळात चिनी लोकांकडे समुद्रात लांब पल्ल्याच्या सफ़रीसाठी स्वत:चे जहाज विकसित नव्हते . हिंदुस्थान , चिनसकट संपूर्ण अशियात अरब जहाजांचा वापर होत असे व हळू हळू सरकणार्‍या अरब जहाजांनी पॅसिफ़िक महासागर ओलांडणे अशक्य आहे .  

इतर दाव्यांबद्दल लिहायचे झाल्यास किमान तीन चार तास जातील , अमेरिकेत पोहोचल्याचा दावा करण्यापैकी , 
खुद्द ब्रिटन , आयर्लंड , पॉलिनेशिया , इस्त्राईल , जपान इत्यादींनी अनेक दावे केलेले आहेत .

तज्ञांनी , त्या काळात असलेली उपलब्ध जहाजे त्यांची एकूण लायकी , समुद्राचे प्रवाह तसेच पोहोचायला लागणारा वेळ , सांस्कृतिक साधर्म्याची शक्यता इत्यादी इत्यादी वरुन प्रत्येक दाव्यांच्या विश्वासहर्ता स्पष्ट केलेली आहे.


Published....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा