शनिवार, २६ मे, २०१२

अमेरिकेचा शोध कोणी लावला? भाग ३



मी वर उल्लेख केल्यामध्ये हिमांशु यांनी उल्लेख केलेल्या वायकींगचा उल्लेख टाळला कारण वायकिंग कोलंबस अगोदर अमेरिका खंडात पोहोचले यात कोणतेही दुमत सध्या कोणत्याही संशोधकास राहिलेले नाही . 


पश्चिम अशियामधील वायकिंग टॊळ्यांनी युरोपात येऊन प्रचंड धुमाकूळ माजवला व पश्चिम उत्तर युरोपात वस्ती केली . मुळात केवळ सशक्त , बलशाली व वेगवानच नव्हे तर दिसायलाही खूप सुंदर जहाजे निर्माण करुन युरोपीयन नद्यांमधुन प्रवास करत संपूर्ण युरोपात प्रचंड लुटालूट करत वायकिंगजनी इसवी सन आठव्या शतकांनंतर युरोपात दहशत निर्माण करुन उत्तर पश्चिम युरोपात सध्याच्या स्कॅंडेनेव्हिया , नॉर्वे , स्वीडन , डेन्मार्क आईसलंड येथे वस्ती केली पुढील काळात ख्रिश्चन धर्म स्विकारुन सांस्कृतिक जीवनही युरोपशी आपलेसे केले . समुद्रसफ़र हा त्यांचा आवडता शौक त्यामुळे डेन्मार्कहून त्यांनी आईसलंड व ग्रीनलंड बेटांचा शोध लावून शक्य तिथे वस्ती केली . युरोपात नद्यांमधील दळणवळणाचे मार्ग आखले जे आजही वापरात आहेत . 


ली या खलाशाचे  यांचे वायकींग फ़्लीट हे डेन्मार्कहून अटलांटिक महासागरात ग्रीनलंड येथे असलेल्या वस्त्यांमध्ये थांबून पश्चिमेकडॆ प्रवास कायम राखत सध्याच्या उत्तर अमेरिकेतील कॅनडा येथे पोहोचले ह्या दाव्यास सर्वमान्यता मिळालेली आहे व ते जिथे पोहोचले त्यास न्यू फ़ाऊंडलंड असे म्हणतात . वायकिंग घरांचे नमुने त्यांच्या चाचण्या यातून ह्या वायकिंग वस्त्या आहेत हे स्पष्ट झालेलेच आहे . कॅनडात आढळलेली जुनी वायकींग नाणी यावरुन वायकिंगकडे हा बहुमान गेलेलाच आहे . 



वादाचा मुद्दा केवळ कॅनडामधील भूभाग ओलांडून नायगारामार्गे ते अमेरिकेतही आले होते का हा आहे व त्यामध्ये अनेक विवाद आहे व त्यावरही संशोधन चालू आहेच . 



असो मुळात हा बहुमान कोलंबसकडून इतरांकडे गेला तरी कोलंबसचे महत्त्व कधीही कमी होणार नाही कारण ख्रिस्तोफ़र कोलंबस हा केवळ अमेरिकेत पोहोचला नाही तर त्याने तो मार्ग शोधून त्याच्या संपूर्ण युरोपात प्रचार केला . पुढे स्पेन , ब्रिटन , पोर्तुगीज , फ़्रेंच यांनी अमेरिकेत येऊन प्रथम आर्थिक उत्पीडनाचे , त्यानंतर युरोपीय वसाहतवादाचे , त्यानंतर दळणवळणाचे ,त्यानंतर युरोपीय व अमेरिकन सांस्कृतिक आर्थिक घडामोडींचे , नंतर राजकीय व आर्थिक सबलीकरणाचे एक युग गाजवले व त्याचे मूळ म्हणजे कोलंबसचा प्रवास याकडेच जाते ... 

Published....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा